राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या दणक्याने मिळाला कामगाराला हक्काचा पगार  

 


 राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या दणक्याने मिळाला कामगाराला हक्काचा पगार  
नवी मुंबई :- दोन महिने कोविड सेंटर मध्ये काम करूनही पगार न देणाऱ्या कंपनीला राजे प्रतिष्ठान कामगार सेनेने धारेवर धरले असता उशिरा का होईना पण कंपनीने सुनील घराळ या कामगाराला त्याचा हक्काचा पगार दिला आहे. टेक्निकल समस्येच्या नावाखाली सुनील घराळ यांचा पगार थांबवुन ठेवला होता.त्यावर राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष योगश महाजन यांनी कंपनीला सुनील घराळ यांचा पगार देण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम दिला होता.तो संपत नाही तोच कंपनीने सुनील घराळ याना पगार दिला आहे.
                पावणे गावात राहणारे सुनील घराळ मास्टर सर्व्हिस क्लीन या कंपनीत कामाला होते.त्यांनी या कंपनीच्या माध्यमातून आर.सि.पी घणसोली कोव्हीड सेंटर मध्ये ८ मे ते ४ जुले या दरम्यान काम केले होते.या दरम्यान त्यांना २२,५०० /- रुपये इतका पगार दिला जाईल असे सांगण्यात आले होते.मात्र काम संपताच त्यांना एकही रुपया देण्यात आला नाही.एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे पगार नाही,त्यात संसाराचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांना पडला असता आता काय याचे कोडे त्यांना पडले.त्यावेळी त्यांनी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे कोपरखैरणे विभाग अध्यक्ष मनोज चव्हाण यांच्याकडे धाव घेत न्याय मिळावा असे लेखी पत्र दिले.त्यानुसार मनोज चव्हाण यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे सुनील घराळ यांच्या पगारासाठी तगादा लावला.तरीही कंपनीचे अधिकारी वेळ मारून नेत असल्याचे लक्षात येताच राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष योगश महाजन यांनी सुनील घराळ यांचा पगार देण्यासाठी अखेर कंपनीच्या अधिकाऱ्यांना सात दिवसांचा अल्टिमेटम दिला.त्यानंतर सर्व समस्यांची पुष्टी करून अखेर मास्टर सर्व्हिस क्लीन या कंपनीने सुनील घराळ यांचा हक्काचा पगार दिला आहे.कामगार कोणताही असो ,त्याची समस्या कोणतीही असो ,ती सोडवणे आमची जबाबदारी आहे.असे सांगत ठाणे जिल्ह्यातील कामगारांच्या हितासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष योगश महाजन यांनी सांगितले.


Popular posts
मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘पोलीस तिथं पुस्तक’ नवी मुंबई मनसेचा उपक्रम, सात पोलिस स्टेशनला पुस्तक लायब्ररीच वाटप
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
विद्यार्थी व पालकांच्या समस्येसाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचा पुढाकार 
नाशिककरांचे नाशिक स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न अधुरेच , सात वर्षात खर्च ७००, कोटीच्या वर पण अजूनही कामे प्रलंबितच
Image
गणपती विसर्जन तराफावर बसून तलावात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू