अरविंदो मीरा संस्थेतर्फे पत्रकारांना सैनेटाईझ व मास्क चे वाटप 


नवी मुंबई - पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून कोरोना काळात त्यालाही संक्रमणाची झळ बसली आहे.स्वत:च्या जिविताची पर्वा न करता बातम्या सर्वापर्यत पोहोचविण्याचे काम ते करत असतात.अशा वेळी पत्रकारांचीही काळजी घेणे हे हितचिंतकांचे कर्तव्यच आहे.याचाच विचार करून नवी मुंबईतील पत्रकार /कैमेरामॅन यांना अरविंदो मीरा संस्थेतर्फे मनपातील पत्रकार कक्षात सोमवारी सैनेटाईझ व मास्क चे वाटप करण्यात आले.
               यावेळी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री,अरविंदो मीरा संस्थेच्या अध्यक्षा नयन पवार,हास्यसम्राट जयवंत ओक,अडव्होकेट नागराज,प्रसाद कोलते, विजया लक्ष्मी हे उपस्थित होते.अरविंदो मीरा संस्थेतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतांनाच कोरोना काळात अनेकांना मदतीचा हातही देण्यात आला.त्याचदरम्यान त्यांनी नवी मुंबईतील पत्रकार /कैमेरामॅन यांनाही सैनेटाईझ व मास्क देण्याचा निर्णय घेतला.सोमवारी दुपारी मनपा पत्रकार कक्षात सैनेटाईझ व मास्क देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असता बहुतांश पत्रकारांनी याचा लाभ घेतला.यावेळी बोलतांना नयन पवार यांनी सांगितले कि सदरील उपक्रम हा एक दिवसासाठी नसून दर प्रत्येक १५ दिवसांनी करण्यात येणार आहे.त्याचबरोबर कोरोना काळात शक्य तितका हातभार लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे असे त्यांनी सांगितले.


Popular posts
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत भ्रष्टाचार करणाऱ्या सह्हायक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांची अखेर उचलबांगडी. लोकमान्य मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर मवाडे यांची बदली,सागर मोरे यांच्याकडे तुर्भे विभागाचा पदभार , मवाडे यांची बदली,मात्र त्यांचे वसुलीबाज अजूनही विभाग कार्यालय हद्दीतच, पवार व शेलार यांच्यावर कारवाई कधी ?
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
नवी मुंबई मेट्रो : परिपूर्ण कनेक्टिव्हिटीच्या दिशेने
Image