इंदिरानगर मधील नागरिकांना गैरसोयीतून मुक्तता मिळण्यासाठी आयुक्तांना निवेदन 

नवी मुंबई - तुर्भे इंदिरा नगर, आंबेडकर नगर, गणेश नगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.त्या गैरसोयीतून मुक्तता मिळावी यासाठी शिवसेनेचे तुर्भे विभाग प्रमुख महेश शंकर कोटीवाले यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर याना समस्यांचे निवेदन दिले आहे.
               यामध्ये इंदिरा नगर येथे आफजल चौधरी दुकान समोरील शौचालयाचे घान पाणी रस्त्यावर वाहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे.त्यामुळे तत्काळ रस्त्यावर वाहत असलेले घान पाणी बंद करण्यात यावे.इंदिरा नगर, बगाडे, आंबेडकर नगर, गणेश नगर,बोनसरी गाव,चुन्नाभटी काॅरी मधील काही ठिकाणी लाईट खांब खराब व बंद अवस्थेत आहे ते दुरूस्ती तसेच नवीन लाईटचे खांब टाकून मिळावे.इंदिरा नगर मधील चौकात एक सार्वजनिक शौचालय बनवण्यात आले आहे. परंतु अध्याप नागरिकांना वापर करण्याकरिता चालु करण्यात आले नाही ते लवकरात लवकर चालू करण्यात यावे.इंदिरा नगर मधील मुख्य रस्त्यापासून ते माऊली मैदान पर्यंत तसेच गल्लोगल्ली मधील रस्ता काँक्रिटीकरण करून मिळावे.इंदिरा नगर, बगाडे, आंबेडकर नगर, गणेश नगर,चुन्नाभटी काॅरी मधील साफसफाई ठेकेदाराकडून गटारे नियमित पणे साफसफाई होत नाही. त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.इंदिरा नगर, बगाडे, आंबेडकर नगर, गणेश नगर,चुन्नाभटी काॅरी,बोनसरी गाव मधील काही ठिकाणचे गटारे तसेच झाकणे तुटलेले आहे ते दुरूस्ती व झाकणे टाकून मिळावे.इंदिरा नगर १) विश्वनाथ श्रीरंग शिंदे  २) अलका सुर्यवंशी  ३) दिनेश जगताप या तिन्ही नागरिकांच्या राहतं असलेल्या ठिकाणी मोठे मोठे  झाडं आहे. ते केव्हाही येथे रहात असलेल्या घरावर पडू शकते याची माहिती तुर्भे डी विभाग अधिकारी यांना आधी देखील देण्यात आली होती. परंतु अध्याप आपल्याकडून येथील तिन्ही झाडे तोडण्यात आले नाही. तरी आपणास विनंती करतो की हे झाडे येथे राहत असलेल्या लोकांच्या घरावर पडून एखादी घडण्यापुर्वी हे झाडे तोडून मिळावे.गेल्या अनेक वर्षापासून येथील नागरिक सुविधेपासून वंचित आहेत यावर तत्काळ पावले उचलावीत अशी मागणी महेश शंकर कोटीवाले यांनी मनपा आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


Popular posts
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
Image
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image