परिवहन सेवेतील कर्मचारी,अधिकारी यांना सातवा वेतन आयोग लागु.कर्मचारी अधिकरी यांच्यात आनंदाचे वातावरण.

नवी मुंबई - महानगर पालिका परिवहन उपक्रमातील अधिकारी व कर्मचारी यांस सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी नुसार वेतन व भत्ते लागू करण्यात आले आहे.महानगर पालिका कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष विजय नाहटा यांच्या सततच्या पाठ पुराव्यामुळे हे यश लाभले असून परिवन विभागात आनंदाचे वातावरण पसरले आहे.नवी मुंबई महानगर पालिका परिवन विभागात न. मुं. म.पा.कर्मचारी कामगार सेनेची युनियन असून सदर युनियनचे अध्यक्ष म्हणून शिवसेना उपनेते विजय नाहटा हे काम पहात आहेत.

                 युनियनच्या सदस्यांनी विजय नाहटा यांच्याकडे परिवहन सेवेतील कर्मचारी अधिकारी यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा म्हणून विनंती केली होती.त्या अनुषंगाने निवृत्त सनदी अधिकारी असलेले विजय नाहटा यांनी त्या दृष्टीने कायदेशीर बाबींची तपासणी करून तसेच  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे ,खासदार राजन विचारे यांच्याशी वारंवार बैठका करून व सततच्या पाठपुराव्यामुळे कर्मचारी अधिकारी यांना सातवा वेतन आयोग लागू करून देण्यात नवी मुंबई महानगर पालिका कर्मचारी कामगार सेनेला यश प्राप्त झाले आहे.सरकारच्या वतीने नुकताच अद्यादेश  (जी.आर) प्रसिध्द करण्यात आला असल्याने परिवहन सेवेतील कर्मचारी अधिकारी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.याकामी संघटनेचे अध्यक्ष तसेच शिवसेना उपनेते , मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती तथा पर्यावरण समाघात प्राधिकरण महाराष्ट्र राज अध्यक्ष विजय नाहटा यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे,नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे,खासदार राजन विचारे, नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे आभार व्यक्त केले आहेत.याकामी संघटनेचे अध्यक्ष विजय नाहटा यांच्यासह उपाध्यक्ष प्रकाश पाटील, सरचिटणीस प्रकाश चिकणे,सह चिटणीस समीर बागवान यांनी परिश्रम घेतले आहेत. परिवन सेवेतील कर्मचारी ,अधिकारी यांनी सातवा वेतन आयोग लागू करून घेतल्या बद्दल शिवसेना उपनेते तसेच संघटनेचे अध्यक्ष विजय नाहटा यांचे सतष: आभार व्यक्त केले असून तुर्भे,आसूडगाव,घणसोली येथील डेपोत विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.


Popular posts
मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘पोलीस तिथं पुस्तक’ नवी मुंबई मनसेचा उपक्रम, सात पोलिस स्टेशनला पुस्तक लायब्ररीच वाटप
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
विद्यार्थी व पालकांच्या समस्येसाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचा पुढाकार 
नाशिककरांचे नाशिक स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न अधुरेच , सात वर्षात खर्च ७००, कोटीच्या वर पण अजूनही कामे प्रलंबितच
Image
गणपती विसर्जन तराफावर बसून तलावात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू